Register     Login    

बोलाचीच कढि बोलाचाच भात

बोलाचीच कढि बोलाचाच भात
चालले जीवन आनंदात

किती ते विचार चर्चांचे आगर
विश्वाचे ते आर्त ह्य़ाच्या उरि

समाजाचे प्रश्न जगाची उन्नती
सर्वागांनी फुले चर्चा ह्यांची

श्रीमंती गरीबी राजकारण मिथ्या
काय काय बोलु कऴेची ना

कोणि एक व्यव्त्ती दिसे उभी शांत
काय हो हा मु्र्ख ह्यासी तमाची ना

असो द्या ते सारे जागा द्यावी
आले आले ते माझे गंतव्य स्थान

उद्या पुन्हा आपण गप्पा मारू नव्या
ऑफिसच्या भानगडि आटपेची ना

बाेलाचीच कढि बोलाचाच भात
चालले जीवन आनंदात

--- जितेंद्र पेंढरकर.

  • 0
  • Posted By : Admin

Login to Comment